हा रस्ता जीव घेणार; वाड्याच्या कंचाड-खानिवली मार्गावर आठ फूट लांब; दोन फूट खोल खड्डे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाडा तालुक्यातील कंचाड खानिवली मार्गावरून तुम्ही जात असाल तर सावधान.. कोणत्याही क्षणी तुमचा घात होऊ शकतो. कारण या मार्गावर सर्वत्र खड्डेड्डेच खड्डे असून अपघाताला आमंत्रण मिळत आहे. तब्बल आठ फूट लांब आणि दोन फूट खोल खड्डे असल्याने मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. भरपावसात या जीवघेण्या खड्ड्यातून प्रवास करताना वाहनचालकांना मात्र प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

रोजच जीवाशी खेळ
कंचाड-खानिवली मार्गावर सध्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. ठिकठिकाणी एवढे खड्डे पडले आहेत की, रस्ता शोधून काढावा लागतो. दुचाकी गाड्या रोज फसत असल्याने चालकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे.

आंदोलनाचा इशारा
कंचाड-खानिवली रस्त्यावर ऐन पावसाळ्यात पडलेले खड्डे अजूनही दुरुस्ती करण्यात आले नाहीत. हे खड्डे बुजवण्याची जबाबदारी नेमकी कोणत्या यंत्रणेची आहे, असा थेट सव वाडावासीयांनी केला आहे. लवकरात लवकर रस्ते दुरुस्त करा अन्यथा मोठे आंदोलन छेडले जाईल असा इशारादेखील ग्रामस्थांनी दिला आहे.