
परिवहन विभागाने समराठी रिक्षाचालकांना मराठी सक्तीची केल्यानंतर कोपरखैरणे थील शिवसेना संपर्क कार्यालयात रिक्षाचालकांना मराठी नकवण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेतला. या उपक्रमांतर्गत मारे ७०० अमराठी रिक्षाचालकांना मराठीचे धडे देण्यात आले बाहेत. त्यापैकी सुमारे साडेचारशे रिक्षाचालक परिवहन विभागाने तलेल्या मराठीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.
रिक्षाचालकांसाठी मराठी भाषा सक्तीची -रण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतल्यानंतर वी मुंबईतील अमराठी रिक्षाचालकांना मराठी कवण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब करे) पक्षाच्या उपजिल्हा संघटक वैशाली परपडे यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांनी कोपरखैरणे येथील सेक्टर ३ मधील आपल्या नसंपर्क कार्यालयात अमराठी रिक्षाचालकांसाठी राठी शिकवणी वर्ग सुरू केले. महाराष्ट्र माझा, राठी माझी संवाद भाषा या अभियानांतर्गत हा पक्रम परिवहन विभाग, कोकण मराठी साहित्य रिषद आणि आनंदस्वरूप फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने राबवण्यात आला. सुमारे ७०० अमराठी रिक्षाचालकांनी या उपक्रमासाठी प्रवेश घेतला. या सर्वांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून त्यांनी आता मराठीमध्ये संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. त्यापैकी ४५० रिक्षाचालक आरटीओ कार्यालयाने घेतलेली मराठीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. नुकत्याच उत्तीर्ण झालेल्या ९० विद्यार्थ्यांच्या बॅचचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना राज्य संघटक अवधेश शुक्ला, आरटीओ अधिकारी संजय चव्हाण, प्रल्हाद चिंगळे, सूरज फडे, विजय पाढांरमिसे, संजय नकाते, आशिष दुरुगडे आदी उपस्थित होते.
१५ ऑगस्टपर्यंत सर्वांचीच परीक्षा होणार
कोपरखैरणे येथील शिवसेना संपर्क कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या या मराठी शिकवणी वर्गाला रिक्षाचालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत साडेचारशे रिक्षाचालक मराठीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. उर्वरीत अडीचशे जणांची परीक्षा येत्या १५ ऑगस्टपर्यंत होणार आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना जिल्हा संघटक वैशाली घोरपडे यांनी व्यक्त केली आहे.


























































