
दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने माजी डब्ल्यूएफआय अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांची लैंगिक छळ प्रकरणात निर्दोष मुक्तता केली आहे. या निर्णयानंतर, कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करणार असल्याची घोषणा केली आहे.
आम्ही या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाणार आहोत, अशी घोषणा कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी ब्रिजभूषण यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर केली आहे. दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने माजी डब्ल्यूएफआय अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांची लैंगिक छळ प्रकरणात निर्दोष मुक्तता केली आहे. या निर्णयानंतर, कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे म्हटले आहे.
दिल्लीतील राउज अव्हेन्यू न्यायालयाने सोमवारी एका महत्त्वाच्या निकालात, भाजपचे माजी खासदार आणि हिंदुस्थानी कुस्ती महासंघाचे (WFI) माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह तसेच सहआरोपी विनोद तोमर यांची महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या लैंगिक छळाच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी त्यांना दोषमुक्त केल्याचे स्पष्ट केले आहे.
जंतरमंतर येथे महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आंदोलनानंतर दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत 15 जून 2023 रोजी सुमारे 1500 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. सिंह हे महासंघाचे प्रमुख असताना त्यांनी हिंदुस्थान आणि परदेशात महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले होते. या प्रकरणी न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.





























































