
इमारतीचे बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच कामगार ठार झाले आहेत. तर अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींच्या अंगात शिरलेल्या सळया कापून बाहेर काढले जात आहे.
गंभीर दुर्घटनेत जखमी झालेल्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना गुरुवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास येरवाड्यातील शास्त्रीनगर चौक वाडिया बंगला गेट नंबर आठ नजीक घडली आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मदतकार्य सुरू केले आहे.
शास्त्रीनगर चौक वाडिया बंगला गेट नंबर आठनजीक नवीन इमारतीचा स्लॅब भरण्याचे काम सुरू होते. रात्रपाळीचे 30 ते 40 कामगार काम करीत असताना अचानक स्लॅब कोसळला. त्यामुळे इमारतीत काम करणारे काही कामगार स्लॅब खाली अडकले गेले. त्यामुळे 5 जण जागीच ठार झाले असून आतापर्यंत अनेक जण गंभीर जखमी झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
मृत्युमुखी पडलेल्याचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. गंभीर जखमी कामगारांना ससून आणि जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी मदत करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत मदतकार्य आणि बचावकार्य सुरू होते.
दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मदतकार्य सुरू केले आहे. मृत्यू झालेले सर्व कामगार बिहारी असल्याची माहिती डीसीपी रोहित पवार यांनी दिली.
5 people have been reported dead and 2 critically injured. The construction work of a mall was being done here when a heavy steel structure collapsed. All laborers belong to Bihar. The reason for the collapse is under investigation: Rohidas Pawar, DCP Pune Police pic.twitter.com/IC4Cokms1a
— ANI (@ANI) February 3, 2022































































