Punjab News ऑफिसमध्ये घुसून एक्स गर्लफ्रेंडला सुऱ्याने भोसकले, प्रियकराचाही गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाबमधील मोहाली येथील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीची तिच्या एक्स गर्लफ्रेंडला ऑफिसमध्येच चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या केली. डिंपल असे मृत तरुणीचे नाव असून, आरोपीची ओळख हरविंदर मान ऊर्फ हॅरी अशी झाली आहे. ते दोघेही एकाच ऑफिसमध्ये कामाला होते. डिंपलची हत्या केल्यानंतर हॅरीने स्वतःच्या गळ्यावर ३० पेक्षा जास्त वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला. या संपूर्ण घटनेचा थरार ऑफिसमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी सातच्या सुमारास हॅरी ऑफिसमध्ये घुसला. त्यावेळी डिंपल तिच्या डेस्कवर बसून काम करत होती. हॅरीने मागून येऊन तिच्यावर अचानक चाकूने वार करण्यास सुरुवात केली. डिंपलने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने तिचा पाठलाग केला. ऑफिसच्या मुख्य दरवाजाजवळ त्याने तिला केसांनी ओढत खाली पाडले आणि तो तिच्यावर सपासप वार करत राहिला. ऑफिसमधील काही कर्मचाऱ्यांनी आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आले नाही. डिंपल जागीच निपचित पडल्यानंतरही आरोपीने थांबला नाही; त्याने तिच्यावर तब्बल २० पेक्षा जास्त वार केले.

डिंपलची हत्या केल्यानंतर आरोपी हॅरी पुन्हा ऑफिसच्या आत गेला, जिथे डिंपल आधी बसली होती. तिथे जाऊन त्याने त्याच चाकूने स्वतःचा गळा चिरण्यास सुरुवात केली. त्याने स्वतःच्या गळ्यावर 30 हून अधिक वार करून जीवन संपवण्याचा थरारक प्रयत्न केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात आणि ऑफिस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

हॅरी आणि डिंपल एका खासगी पॅकर्स अँड मूव्हर्स कंपनीत गेल्या सुमारे तीन वर्षांपासून एकत्र काम करत होते. या काळात त्यांच्यात मैत्री झाली आणि नंतर त्यांच्यात प्रेमप्रकरण सुरू झालं मात्र त्या दोघांमध्ये काही गैरसमज निर्माण झाल्याने त्यांचा ब्रेकअप झाला होता. आरोपीने पुन्हा एकदा हे नाते जोडण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्याला अपयश आले. ज्यामुळे तो प्रचंड नाराज आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता.