वेडाच आहेस! मी उद्या तुमच्या घरी आलो तर….!! अजित पवार भडकले

राष्ट्रवादीमधील फुटीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची 12 ऑगस्ट रोजी पुण्यात पहिल्यांदाच गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आली होती. दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली ज्यामुळे राजकीय वर्तुळात दिवसभर याचीच चर्चां होती. कोल्हापूर जिल्हात ध्वजारोहण कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर त्यांना पत्रकारांनी घेरले आणि त्यांना शरद पवार यांच्यासोबत झालेल्या गुप्त बैठकीविषयी विचारले. प्रश्न वितारणाऱ्या पत्रकारावर आवाज चढवत अजित पवार म्हणाले की “मला काय कारण आहे लपून जाण्याचं ? तू कुठे बघितलंस मला लपून गेलेलं? तुम्ही मला लपून गेलेलं कुठे बघितलं. मी उद्या तुमच्या घरी आलो तर घरातून केव्हा बाहेर पडायचं हा माझा अधिकार आहे ना ?”

पुण्यातील उद्योगपती चोरडिया यांच्या घरी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली होती. या भेटीनंतर चोरडियांच्या बंगल्यातून बाहेर पडत असताना एका गाडीचा अपघात झाला होता. या गाडीत अजित पवार होते आणि ते पत्रकारांची नजर चुकवून जाण्याचा प्रयत्न करत होते अशा अफवा पसरल्या होत्या. याबाबत दुसऱ्या एका पत्रकाराने अजित पवार यांना प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले की, “अरे वेड्या मी त्या गाडीतच नव्हतो, तर त्यामधून मी उतरणार कसा ? मी बैठकीला गेल्याचे मान्य करतोय मात्र ज्या गाडीचा अपघात झाल्याचे तुम्ही म्हणताय त्यात मी नव्हतोच. वेडाच आहे!” मी लपून गेलेलो नाही. मी उजळ माथ्याने फिरणारा कार्यकर्ता आहे, मला काय कारण आहे लपून जाण्याचं ? आमची भेट झाल्याचे मी कबूल करत असल्याचेही अजित पवार यांनी म्हटले.

पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपुलाचा उद्घाटन सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. तर, दुसरीकडे साखर उद्योगाच्या दृष्टीने महत्वाची संस्था असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री राजेश टोपे पुण्यात होते. या दोन्ही कार्यक्रमानंतर अजित पवार व शरद पवार हे एका व्यावसायिकाच्या घरी भेटले. तिथे त्यांच्यात दोन तास चर्चा झाल्याचे समजते. या भेटीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. आज कोल्हापुरात बोलताना पवार यांनी म्हटले की, “यापुढे आम्ही कधीही भेटलो, दिवाळीत किंवा कोणाच्या घरी भेटलो तर त्यातून कोणताही अर्थ काढू नका ती कौटुंबिक भेट असते.”