निष्ठावंत राजाभाऊ वाजे यांना नेटिझन्सचा तुफान प्रतिसाद, दोन दिवसांत चाळीस हजार फॉलोअर्स वाढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सत्ताधाऱ्यांच्या फोडाफोडीच्या राजकारणाला धुडकावून लावून शिवसेनेसोबत एकनिष्ठ असलेले नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्यावर नेटीझन्सकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. दोनच दिवसांमध्ये त्यांच्या इन्स्टाग्राम व फेसबुक पेजवर मिळून तीस ते चाळीस हजार फॉलोअर्स वाढले आहेत. नेटीझन्सकडून त्यांच्या निष्ठsला, प्रामाणिक भूमिकेला जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

शिवसेनेशी सहा खासदारांनी गद्दारी केली. समाजमाध्यमांवरही त्याचे तीक्र पडसाद दिसून आले, अनेकांनी गद्दारांविरोधात चीड व्यक्त केली. एकीकडे फुटलेले खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या फॉलोअर्सच्या संख्येत हजारोंनी घट झाली असताना दुसरीकडे निष्ठावंत खासदार राजाभाऊ वाजे यांना जनतेने जोरदार पाठिंबा दिला आहे. खासदार वाजे यांच्या समाज माध्यमांवरील पोस्ट्सची लोकप्रियता वाढली आहे. शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहणाऱ्या लोकप्रतिनिधींबद्दल जनतेत अधिक विश्वास व आत्मियता आहे, हेच खासदार वाजे यांच्या वाढत्या फॉलोअर्सच्या संख्येने अधोरेखित केले आहे.