
पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील एका निवृत्त बसचालकाच्या घरात तब्बल २८ कोटी रुपयांची रोकड आणि १५ किलो सोन्याची बिस्किटे सापडली आहेत. मिनार मोंडल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
एकूण जप्त करण्यात आलेली संपत्ती ४९ कोटींची आहे. नोटांचा ढिगारा पाहून अधिकारीही चक्रावले. या नोटा मोजताना पाच मशिन्स बिघडल्या. मिनार मोंडल हा दगड व्यावसायिक तुलू मोंडलचा नातेवाईक आहे. तुलू मोंडलने २०२४ मध्ये आपल्या मुलीच्या आलिशान लग्नासाठी १०० कोटींहून अधिक रुपये खर्च केले होते. आता पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत की, कोट्यवधी रुपयांची रोकड आणि सोने कुठून आले व यामागे कोणाचे नेटवर्क कार्यरत होते.





























































