40 देशांमध्ये ‘सुसाइड किट’ विकून शेफने घेतला अनेकांचा बळी

कॅनडामध्ये एक भयंकर प्रकार उघड झाला आहे. येथे एका कॅनेडियन शेफने विषारी पदार्थ तयार करुन अनेकांचा जीव घेतला आहे. या शेफने असे पदार्थ तयार केले जे जे खाणे अपायकारक होते. कॅनडामील अनेकांचा हे अन्न खाल्याने  विषबाधा होऊन मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. परंतु असे विषारी पदार्थ त्याने का बनवले याचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, कॅनडाचा रहिवासी असलेल्या या व्यक्तीचे नाव केनेथ लॉ (58) असं आहे. केनेथला हा एक शेफ (आचारी) आहे. त्याला वेगवेगळे अन्नपदार्थ बनवण्याची आवड होती.  त्याने एक अशी डिश बनवली की जी खाऊन एखाद्याचा जीव जाऊ शकतो. या डिशला त्याने ‘सुसाइड किट’ असे नाव दिले. केनेथने हा पदार्थ कॅनडामध्ये विकायला सुरुवात केली. हे अन्न खाउन कॅनडामधील 14 जणांचा मृत्यू झाला.

केनेथने हळूहळू ऑनलाईन डिलिव्हरीच्या माध्यमातून हा पदार्थ परदेशात विकायला सुरुवात केली. 1200 हून अधिक पॅकेजेस त्याने परदेशात पाठवले होते. आपल्या ग्राहकांना केनेथने या पदार्थ खाण्यासाठी प्रोत्साहित केले होते. या किटचे सेवन केल्‍याने 40 देशांतील अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. असंख्य निष्पाप लोकांच्या हत्येप्रकरणी केनेथ लॉ याला अटक करण्यात आली आहे.

ब्रिटेनमध्ये 88 लोकांचा मृत्यू-
ब्रिटेनमधील 272 लोकांनी केनेथकडून सुसाईड किट विकत घेतले होते. त्यापैकी 88 जणांचा मृत्यू झाला आहे. तेथील स्थानिक पोलीस सतर्क झाले असून न्यूझीलंड आणि इटलीसह इतर अनेक देशातील पोलिसांनीही तपास सुरू केला आहे. या देशांमध्ये नऊ खरेदीदारांची ओळख पटली आहे. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे.