टी-20 वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानी वंशाच्या खेळाडूंचा बोलबाला; 20 पैकी 8 संघांमध्ये मूळ हिंदुस्थानी असलेल्या खेळाडूंची निवड

हिंदुस्थान हा क्रिकेटपटूंची खाण आहे हे आता कुणापासूनही लपलेले नाही. जगभरात होणाऱ्या लीगला हिंदुस्थानच खेळाडू पुरवतोय आणि आगामी टी-20 वर्ल्ड कपलाही हिंदुस्थानी खेळाडूंची फुलवले आहे. म्हणजे यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपसाठी 20 संघांनी आपले 15 सदस्यीय संघ जाहीर केलेत आणि या संघांपैकी आठ संघांमध्ये हिंदुस्थानी वंशाच्या खेळाडूंचाच अधिक भरणा असल्याचे दिसून आलेय. याचाच अर्थ यंदा वर्ल्ड कपमध्ये जास्तीत जास्त खेळाडू हिंदुस्थानी वंशाचेच दिसणार हे जवळजवळ निश्चित झालेय. अमेरिका आणि पॅनडा या संघातील निम्मे खेळाडू मूळ हिंदुस्थानी असल्यामुळे ते दोन्ही संघ अर्ध हिंदुस्थानी झालेत. तसेच ओमान, युगांडा, न्यूझीलंड, वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलॅण्डस् या संघांमध्येही हिंदुस्थानी वंशाचे खेळाडू खेळताहेत. त्यामुळे या वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानी वंशाच्या खेळाडूंचाच बोलबाला असेल.

जसे हिंदुस्थानी वंशाचे खेळाडू आठ संघांमध्ये दिसताहेत तसेच पाकिस्तानी वंशाचेही खेळाडू अनेक संघात खेळणार आहेत. तो आकडा हिंदुस्थानी वंशाच्या खेळाडूंपेक्षा नक्कीच कमी आहे, पण त्यांचे एकपेक्षा अधिक खेळाडू अमेरिका, पॅनडा संघात आहेत. तसेच इंग्लंड, स्कॉटलंड आणि दक्षिण आफ्रिकन संघात एकेक पाकिस्तानी वंशाच्या खेळाडूची निवड केली गेली आहे. त्याचप्रमाणे ओमान, युगांडा या संघातही मूळचे पाकिस्तानी असलेले खेळाडू निवडण्यात आले आहेत.

टी-20 वर्ल्ड कपसाठी निवडलेले संघ

कॅऍनडा :  साद बिन जफर (कर्णधार), नवनीत धालीवाल, एरॉन जॉन्सन, श्रेयस मोव्वा (यष्टिरक्षक), रवींद्रपाल सिंग, पंवरपाल ताठगूर, दिलप्रीत बाजवा, जुनैद सिद्दिकी, निकोलस कर्टन, परगट सिंग, रय्यान पठाण, हर्ष ठाकर, जेरेमी गॉडर्न, डिल्लॉन हेलिगर, कलीम साना. राखीव :  ताजिंदर सिंग, आदित्य वरदराजन, अम्मार खालिद, जतिंदर मथारू, परवीन कुमार.

हिंदुस्थान : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पंडय़ा, शिवम दुबे, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज. राखीव : शुबमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद, आवेश खान.

पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), फखर झमान, मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, आझम खान (यष्टिरक्षक), सईम अयुब, उस्मान खान, इमाद वसीम, शादाब खान, अब्बास आफ्रिदी, अबरार अहमद, हारिस रऊफ, मोहम्मद आमीर, नसीम शाह, शाहिन शाह आफ्रिदी,

अमेरिका : मोनांक पटेल (कर्णधार), अॅरोन जोन्स (उपकर्णधार), अँड्रिज गॉस, कोरी अँडरसन, शायन जहांगिर, हरमीत सिंग, जेसी सिंग, मिलिंद कुमार, निसर्ग पटेल, नितीश कुमार, नोस्तुश पेंजिगे, सौरभ नेत्रावळकर, शेडली व्हॅन शॅकविक, स्टीव्हन टेलर, अली खान. राखीव :  गजानंद सिंग, जुनॉय ड्रिसडेल, यासीर मोहम्मद.

कोहली अमेरिकेतील सराव सामन्याला मुकणार; विश्रांतीनंतर वर्ल्ड कपच्या स्वारीवर रवाना होणार

आयर्लंड : पॉल स्टर्लिंग (कर्णधार), रॉस अदायर, अॅण्डी बॉलबर्नी, नील रॉक, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, मार्क अदायर, कर्टिस पॅम्फर, गॅरेथ डेलनी, जॉर्ज डॉकरेल, ग्रॅहम ह्युम, जोश लिटल, बॅरी मॅककर्थी, बेन व्हाइट, व्रेग यंग.

ऑस्ट्रेलिया : मिशेल मार्श (कर्णधार), टीम डेव्हिड, ट्रव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू वेड (यष्टिरक्षक), जोश इंगलिस (यष्टिरक्षक), पॅमरून ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, अॅश्टन एगर, पॅट कमिन्स, नॅथन एलिस, जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क, अॅडम झम्पा. राखीव – जेक फ्रेझर-मॅकगर्क, मॅथ्यू शॉर्ट.

इंग्लंड  :  जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टॉ, हॅरी ब्रूक, सॅम करन, बेन डकेट, टॉम हार्टली, विल जॅक्स, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल राशीद, फिल सॉल्ट, रिस टॉपली, मार्क वूड.

ओमान : आकिब इलियास (कर्णधार), प्रतीक आठवले (यष्टिरक्षक), खालिद काइल, मेहरान खान, नसीम खुशी, काश्यप प्रजापती, शोएब खान, झिशान मकसूद, अयान खान, मोहम्मद नदीम, बिलाल खान, फय्याज बट, कलीमुल्लाह, शकील अहमद, रफीउल्लाह. राखीव : जतिंदर सिंह, समय श्रीवास्तव,  सुफयान महमूद, जय ओडेदरा.

स्कॉटलंड : रिची बेरिंग्टन (कर्णधार), मॅथ्यू क्रॉस (यष्टिरक्षक), मायकल जोन्स, जॉर्ज मन्सी, मायकल लिस्क, ब्रॅण्डन मॅकलन, ख्रिस ग्रिव्ह्ज, जॅक जार्विस, साफयान शरीफ, ख्रिस सोल, मार्क वॅट, ब्रॅड व्हिल, ओली कार्टर, ब्रॅडली, करी, चार्ली टीअर.

नामिबिया : गेरार्ड इरासमस (कर्णधार), निकोलास डेव्हिन, झेन ग्रीन (यष्टिरक्षक), जीन-पिएर कोत्झे, मलान क्रुगर, डिलान लिचर, जोहानस स्मित (उपकर्णधार), जॅन प्रिलिंक, डेव्हिड विस, मायकल वॅन लिंजन, पीटर-डॅनियल ब्लिगनॉट, जॅक ब्रसल, टँजनी लुंगामेनी, बेन शिकाsंगो, बर्नार्ड शॉल्ट्ज, रुबेन ट्रम्पलमन.

अफगाणिस्तान : राशीद खान (कर्णधार), रहमनुल्लाह गुरबाज (उपकर्णधार), इब्राहिम झादरान, मोहम्मद इशाक (यष्टिरक्षक), नजिबुल्लाह झादरान, अजमतुल्लाह ओमरझाई, गुलाबदीन नईब, मोहम्मद नबी, नांगेयालिया खरोटे, फरीद अहमद, फझलहक फारुखी, मुजीबूर रहमान, नवीनुल हक, नूर अहमद. राखीवः सादिक अटल, हजरतुल्लाह झझई, सलीम साफी.

न्यूझीलंड  : केन विल्यमसन (कर्णधार), फिन अॅलन, ट्रेंट बोल्ट, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हन कॉन्वे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, जिमी नीशमा्, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सॅण्टनर, ईश सोधी, टीम साऊदी. राखीव : बेन सिअर्स.

पापुआ न्यू गिनी : अस्साद वाला (कर्णधार), सेसे बाऊ, किपलिन डोरिगा, हीरी हीरी, लेगा सियाका, टॉनी उरा, चार्ल्स अमिनी (उपकर्णधार), सेमो कामिया, जॉन करिको, कबुआ मोरिया, अलेई नाओ, चाद सोपर, नॉर्मन वानुआ, जॅक गार्डनर, हिला वेअर.

युगांडा : ब्रायन मसाबा (कर्णधार), रियाजत अली शाह (उपकर्णधार), फ्रेड अचिलम (यष्टिरक्षक), दिनेश नकरानी, अल्पेश रामजानी, केनिथ वायसवा, बिलाल हसन, कॉसमॉस क्येवुटा, रॉजर मुकासा, फ्रँक एनसुबुगा, रॉबीन्सन ओबुया, रोनक पटेल, हेन्री एसेनयोंदो, सायम एसेसाजी. राखीव : इनोसंट एमबेवेज, रोनाल्ड लुटाया.

वेस्ट इंडीज : रोवमन पॉवेल (कर्णधार), अल्झारी जोसेफ (उपकर्णधार), जोन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, शामर जोसेफ, ब्रॅण्डन किंग, निकोलस पूरन, शाय होप, आंद्रे रसल, रोमारियो शेफर्ड, ओबेड मॅकॉय, अकिल होसेन, गुदाकेश मोती, शेरफन रुदरपर्ह्ड.

बांगलादेश : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तस्किन अहमद (उपकर्णधार), लिटन दास, सौम्या सरकार, तनजीद हसन, शाकिब अल हसन, तौहीद हृदोय, महमुदुल्लाह, जखार अली, तन्वीर इस्लाम, महेदी हसन, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम, तनजीम हसन. राखीव खेळाडू : हसन महमूद, अफिफ हुसेन.

नेपाळ : रोहित पौडल (कर्णधार), आसिफ शेख (यष्टिरक्षक), दीपेंद्र सिंग ऐरी, कुशल भुरटेल, संदीप जोरा, करण खत्री छेत्री, कुशल मल्ला, प्रतिश घरती छेत्री, अनिल साह, सोमपाल कामी, अबिनाश बोहरा, गुलसन झा, ललित राजबंशी, कमल ऐरी, सागर धकाल.

दक्षिण आफ्रिका : एडन मार्करम (कर्णधार), क्विंटन डिकॉक, हेन्रीक क्लासन,  रिझा हेंड्रिक्स, रायन रिकलटन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, माकाx यान्सन, ओटनील बार्टमन, जिराल्ड कोत्झी, ब्यॉर्न पर्ह्टुइन, केशव महाराज, अॅनरिक नॉर्किया, पॅगिसो रबाडा, तबरेज शम्सी.

नेदरलॅण्ड्स : स्कॉट एडवर्ड्स (यष्टिरक्षक-कर्णधार), वेस्ली बरेसी, मायकल लेविट, मॅक्स ओडाऊड, विक्रमजीत सिंह, बास दी लीडे, सीब्रॅण्ड एंजलब्रेश्ट, तेजा निदामनुरू, टीम प्रिंगल, आर्यन दत्त, विवियन किंगमा, फ्रेड क्लासन, लोगान वॅन बीक, पॉल दोराम, पॉल वॅन मीकरन. राखीव : रायन क्लेन.

श्रीलंका : वानिंदु हसरंगा (कर्णधार), कुसल मेंडिस (यष्टिरक्षक), पथुम निस्सांका, सदीरा समरविक्रमा (यष्टिरक्षक), चरिथ असलांका, धनंजया डि’सिल्व्हा, अँजेलो मॅथ्यूज, कमिंदु मेंडिस, दासुन शनाका, दुश्मंता चमिरा, दिलशान मदुशंका, मथिशा पथिराना, महीश तीक्षणा, नुवान तुषारा, दुनिथ वेल्लालगे.
राखीव : असिथा फर्नांडो,