
पती-पत्नी आणि सासू-सासऱ्यांनी एकत्रितपणे केलेला डान्स सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. या कुटुंबाने ट्रेंडिंगमध्ये असलेल्या ‘वेड लावलं’ या गाण्यावर केलेल्या भन्नाट डान्सने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. त्यांची ऊर्जा, उत्साह, स्टेप्स आणि हावभाव पाहून नेटकऱ्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. @trailsandtastes_together या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या गॉड कुटुंबाने सर्वांची मने जिंकली आहेत. या व्हिडीओला तब्बल 1.5 मिलियन ह्यूव्ज मिळाले आहेत.




























































