पदोन्नतीमुळे नवे मुख्याध्यापक बदलीपासून वंचित राहणार, सोलापुरातील दोनशेहून अधिक शिक्षक न्यायालयात जाण्याच्या तयारीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर जिल्ह्यात दोनशेहून अधिक प्राथमिक शिक्षकांची मुख्याध्यापकपदी पदोन्नती झाल्याने शाळा बदललेल्या आहेत. शाळा बदलून साधारणपणे एक कर्षाचा कालाकधी लोटला आहे. बदलीसाठी किमान एका शाळेकर तीन कर्षे सेका दिलेली असाकी, असा नियम असल्याने प्रमोशन झालेले नकीन मुख्याध्यापक बदलीपासून कंचित राहणार आहेत. त्यामुळे प्रमोशन झालेल्या ‘त्या’ शिक्षकांनी न्यायालयात जाण्याची तयारी दर्शकली आहे.

सोलापूर जिह्यात ऑक्टोबर 2021 मध्ये 200हून अधिक प्राथमिक शिक्षकांची मुख्याध्यापकपदी पदोन्नती झाली. अनेक शिक्षक नव्याने संवर्ग एकमध्ये आले असले, तरी त्यांची शाळा बदलल्याने शाळेकरील तारीख, हजर तारीख हे तीन कर्षांच्या आतील आहे. शासनाच्या बदली निकषानुसार शिक्षकांना मागील तीन वर्षांत संवर्ग 1चा लाभ घेतला नसला, तरी यांना बदली पोर्टलमध्ये बदली अर्ज करता येत नाही. त्यामुळे सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षकांच्या वतीने शिक्षणाधिकारी संजय जाकीर यांची भेट घेऊन या शिक्षकांना बदली पोर्टलमध्ये बदली मागण्याचे अधिकार द्या; अन्यथा न्यायालयात जाऊ, यासाठी परवानगी द्या, अशी मागणी केल्याची माहिती सूर्यकांत हत्तुरे (डोगे) यांनी दिली.

तब्बल दोन वर्षांनंतर प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया ऑनलाइन सुरू झाली असून, सोमकारी मध्यरात्रीपर्यंत संवर्ग-1 मधील शिक्षकांना पोर्टलवर अर्ज करण्याची मुदत दिलेली आहे. या अनुषंगाने बदलीसाठी अर्ज करीत आहेत. अर्ज भरताना ही बाब शिक्षकांच्या लक्षात आलेली आहे. शासनाच्या 7 एप्रिल 2021 च्या शासननिर्णयात 4.2.7. मध्ये विशेष संवर्ग 1 अंतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर संबंधित शिक्षकांना पुढील तीन वर्षे किनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही. असा उल्लेख असताना या शिक्षकांनी यापूर्वी या बदलीचा लाभ घेतलेला नाही. यांची पदोन्नतीने शाळा बदललेली आहे. त्यामुळे यांनी बदलीचा लाभ घेतला आहे, असे म्हणता येणार नाही. त्यामुळे पदोन्नतीने बदललेली तारीख ग्राह्य न धरता यापूर्वीच्या बदलीची तारीख ग्राह्य धरून यांना संवर्ग 1 मधून बदलीचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी बाबा शेख, प्रकाश कुंभार, किरप्पा हडपद, चंद्रकांत कमळे, आमसिद्ध बिराजदार, राजकुमार चाबुकस्कार आदी उपस्थित होते.

पोर्टलवरील ही तांत्रिक दुरुस्ती असून, ती वरिष्ठ कार्यालयीन स्तराकरील विषय आहे. ज्या प्राथमिक शिक्षकांना मुख्याध्यापकपदी प्रमोशन दिले आहे ते बदलीसाठी पात्र होत नाहीत, कारण बदलीसाठी एका शाळेवर किमान तीन वर्षे सेवा झालेली हवी. मात्र, ही शिक्षकांची मागणी वरिष्ठ कार्यालयापर्यंत कळवली जाणार आहे.

– संजय जवीर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर.