पाकिस्तानींची वयचोरी, इमर्जिंग आशिया चषक विजेत्या संघात सहा घोडे क्रिकेटपटू

इमर्जिंग आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील (23 वर्षांखालील) विजेत्या पाकिस्तानी संघातील तब्बल सहा क्रिकेटपटू हे वयचोरी करून खेळले असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानी संघातील तब्बल 6 खेळाडू हे 23 वर्षांहून अधिक वयाचे होते. या घोडय़ा क्रिकेटपटूंच्या जिवावर पाकिस्तानने इमार्ंजग आशिया चषक जिंकल्याने त्यांच्या विश्वासहार्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

श्रीलंकेत पार पडलेल्या इमार्ंजग आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला ज्युनिअर आशिया चषक म्हणूनही ओळखले जाते. या स्पर्धेत आता पूर्वीसारखे फारसे वयाचे बंधन नसले तरी ही स्पर्धा 23 वर्षांखालील खेळाडूंचीच म्हणून ओळखली जाते. त्यामुळे हिंदुस्थानी संघाने प्रामाणिकपणे 23 वर्षांखालील खेळाडूंनाच या स्पर्धेत संधी दिली, मात्र पाकिस्तान व बांगलादेश या संघांमध्ये 30 वर्षे वयापर्यंतचेही खेळाडू होते. हिंदुस्थानविरुद्धच्या अंतिम लढतीत 71 चेंडूंत 108 धावांची मॅचविनिंग खेळी करणारा पाकिस्तानचा तैयब ताहिर हा या स्पर्धेतील सर्वात वयस्क क्रिकेटपटू होय. 26 जुलैला तो 30 वर्षांचा होणार आहे. पाकिस्तानसाठी त्याने 3 टी-20 सामनेही खेळलेले आहेत. शाहनवाज दहानीनेही पाकिस्तानकडून 2 वन डे आणि 11 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले आहेत. तो आता 24 वर्षांचा आहे. कमरान गुलाम हा 27 वर्षांचा असून, ओमिर बिन युसुफ 24 वर्षांचा आहे. याचबरोबर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज अमाद बट्ट हा वयाच्या 28व्या वर्षी, तर साहिबदाजा फरमान हा वयाच्या 27 व्या इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेत खेळला.