विमानतळाची सैर युटय़ूबरला भोवली

 

बंगळुरू ते चेन्नई प्रवास करण्याच्या बहाण्याने एअरपोर्टवर घुसखोरी करून सुरक्षेचा भंग करणाऱया विकास गौडा या यूटय़ूबरला अटक झाली. 12 एप्रिल रोजी विकासने व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ अपलोड केला होता. व्हिडीओ पाहून केपेनगोवडा इंटरनॅशनल एअरपोर्टच्या सुरक्षा रक्षकांनी  त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. उत्तर पूर्व विभागाचे डीसीपी लक्ष्मी प्रसाद यांनी सांगितले की, आरोपी विकास गौडा याने 7 एप्रिल रोजी बंगळुरू ते चेन्नईचे विमानाचे तिकीट बुक करून विमानतळावर प्रवेश मिळवला. मात्र तो बार्ंडग गेटकडे गेला नाही. त्याने प्रतिबंधित भागात अवैधरीत्या प्रवेश करून दृश्यांचे चित्रीकरण सुरू केले.