शाब्बास मुलींनो… 12 वर्गमैत्रिणींची केली बालविवाहापासून सुटका

ग्रामीण भागात आजही बालविवाह होतात. लहान वयात मुलींचे लग्न लावून त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले जाते. मात्र महाराष्ट्रातील एका उपक्रमामुळे आणि वर्गमैत्रिणी- वर्गमित्रांच्या सजगतेमुळे 12 बालविवाह रोखण्यास मदत झाली.

अलीकडेच छत्रपती संभाजीनगरमध्ये हा प्रकार घडला. एप्रिलमध्ये परीक्षा संपल्यानंतर मे महिन्यात निकाल जाहीर झाले. विद्यार्थ्यांच्या प्रगतीपुस्तकावर चाईल्ड हेल्पलाइन नंबर होते. बालविवाह रोखण्यासाठी सरकार पातळीवर सुरू असलेल्या उपाययोजनेचा भाग म्हणून प्रगती पुस्तकावर चाईल्ड हेल्पलाइन क्रमांक देण्यात आले आहेत. 1098 आणि 112 हे चाईल्ड हेल्पलाइन क्रमांक आहेत. याच हेल्पलाइन क्रमांकाला पह्न करून तब्बल 12 बालविवाह रोखण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे ज्या मुलींचे बालविवाह होत होते, त्या मुलींच्या वर्गमैत्रिणींनी आणि वर्गमित्रांनीच चाईल्ड हेल्पलाइन क्रमांकावर पह्न केला. पह्नवरून संबंधित मुलींची माहिती, नाव आणि पत्ता दिला. वर्गमित्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलीस आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी बालविवाह रोखले. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हे बालविवाह पार पडणार होते.

शाळाशाळांमध्ये जनजागृती

राज्यातील बालविवाह रोखण्याकरिता शिक्षण विभागाने उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार सकाळच्या प्रार्थनेत बालविवाहाविरुद्धची शपथ घेणे; शाळांमध्ये वत्तृत्व, निबंध, पोस्टर बनवणे स्पर्धा आदी पावले उचलली गेली आहेत.

– विद्यार्थिनीच्या शाळेतील दीर्घकाळ गैरहजेरीवर लक्ष ठेवले जाते. पालकांचे समुपदेशन केले जाते. परिणामी बालविवाहाच्या तक्रारींमध्ये वाढ होऊन हे बालविवाह रोखण्यास यश येत आहे. राष्ट्रीय काwटुंबिक आरोग्य सर्वेक्षणात बालविवाहांचे प्रमाण जास्त असल्याने महाराष्ट्रातील 12 जिह्यांमध्ये बालविवाहविरुद्ध जनजागृती मोहिम राबवण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगरच्या शाळांमध्येही ही योजना राबवली गेली.