लातूर विभागात 123 विद्यार्थ्यांनी मिळवले 100 टक्के गुण

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या लातूर विभागातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत महाराष्ट्रातून तब्बल 183 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. यामध्ये लातूर विभागातील 123 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रामध्ये लातूर विभागीय परीक्षा मंडळाचा निकाल सातव्या क्रमांकावर असला तरी 100 टक्के गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये लातूर विभाग यावर्षी पुन्हा अव्वल ठरला आहे. महाराष्ट्रातील 183 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवलेले आहेत. त्यामध्ये लातूर विभागीय परीक्षा मंडळातील तब्बल 123 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सन 2023 मध्ये झालेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत महाराष्ट्रात 151 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले होते. यामध्ये लातूर विभागीय मंडळातील 108 विद्यार्थ्यांचा समावेश होता. यावर्षी पुन्हा लातूर विभाग राज्यात अव्वल ठरला आहे.