लातुरात गुटखा आणि अवैध दारूवर धाडी; 21 लाखाचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक

लातूरच्या विराट नगर, खाडगाव रोड परिसरात प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूची चोराटी विक्री करण्यासाठी व त्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बोलेरो पिकअप वाहन असा एकूण 18 लाख 33 हजार 550 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित पान मसाला तंबाखू जप्त करण्यात आली आहे.

विराट नगर, खाडगाव रोड परिसरात प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची विक्री होत असल्याची बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी छापा मारून एका व्यक्तीस ताब्यात घेतले. त्यांच्याकडून महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेले वेगवेगळ्या कंपनीचे, महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित असलेले गुटखा व सुगंधित पानमसाला व त्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बोलेरो पिकअप वाहन असा एकूण 18 लाख 33 हजार 550 रुपयांचा प्रतिबंधित गुटका व सुगंधित पान मसाला तंबाखू जप्त करण्यात आले आहे.

पोलीस अंमलदार अंगद कोतवाड यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे एमआयडीसी येथे प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची अवैद्य साठवणूक करून विक्री व्यवसाय करणारा फिरोज उर्फ आदम आयुब उमाटे वय 30 वर्ष, राहणार विराट नगर, खाडगाव रोड, लातूर याच्या विरुद्ध पोलीस ठाणे एमआयडीसी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस करीत आहेत.

उदगीर ग्रामीण हद्दीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून चोरटी विक्री व्यवसाय करणारा राहुल लक्ष्मण कांबळे, वय 29, राहणार लोहारा, तालुका उदगीर जिल्हा लातूर. याला देशी दारूची अवैध वाहतूक करण्यात येत असलेल्या कारसह ताब्यात घेऊन त्यामधील 53 हजार रुपये किमतीचे 16 बॉक्स देशी दारू कारसह जप्त करून रीतसर गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर कार्यवाही करिता उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात, व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वातील पथकामधील पोलीस अंमलदार अंगद कोतवाड, माधव बिलापट्टे, राजेश कंचे, तुराब पठाण, राजाभाऊ मस्के, सचिन मुंडे, बालाजी जाधव, रवी कानगुले यांनी पार पाडली.