
अडीअडचणीला विमा पॉलिसीवर कर्ज घेणे हा एक चांगला पर्याय आहे. कारण विमा पॉलिसीवरील कर्ज मिळणे खूप सोपे आहे आणि त्यावर व्याजदेखील कमी आहे.
तुम्हाला देण्यात येणारी कर्जाची रक्कम ही पॉलिसीची सरेंडर रक्कम आणि गुंतवणूक यावर अवलंबून असते. या रकमेच्या 80-90 टक्क्यांपर्यंत कर्ज घेऊ शकता.
मनी बँक किंवा एंडाउमेंट पॉलिसी असेल तरच तुम्हाला असे कर्ज मिळते. पॉलिसीवरील व्याजाचा दर प्रीमियमची रक्कम आणि भरलेल्या प्रीमियमच्या संख्येवर अवलंबून असतो.
तुम्हाला कर्जासाठी अर्ज करायचा असेल, तर तुम्हाला त्यासाठी विमा कंपनी किंवा संबंधित बँकेशी संपर्क साधावा लागेल. तुमच्या विमा पॉलिसीची संपूर्ण माहिती द्यावी लागेल.
विम्यावरील कर्ज घेण्यासाठी मूळ विमा पॉलिसीची कागदपत्रे आणि कॅन्सल चेक आवश्यक आहे. सर्व तपशील भरल्यानंतर कर्जाची रक्कम तुमच्या खात्यावर येते.
loan against insurance policy: easy process, low interest rates and eligibility criteria
need urgent funds? taking a loan against your insurance policy is a smart move. learn about eligibility, interest rates, and the 80-90% surrender value loan limit.


























































