नवी मुंबईत इर्शाळवाडीचा रिप्ले; डोंगरावरून अचानक ढिगारा कोसळला.. अनेक गाड्या मलब्याखाली अडकल्या, सुदैवाने जीवितहानी टळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावणे एमआयडीसीत आज भयंकर घटना घडली. एमआयडीसीतील सी लेनवर असणाऱया पाच ते सहा पंपन्यांवर नजीकच्या डोंगरावरून दगडमातीचा लोळ प्रचंड वेगाने कोसळला. या दुर्घटनेत पंपनीतील सामुग्री तसेच आवारात पार्क केलेल्या सहा ते सात गाडय़ा दबल्या गेल्या.दैव बलवत्तर म्हणून सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र इर्शाळवाडीसारख्या दुर्घटनेचा हा रिप्ले पाहून कामगार सैरावैरा पळत सुटले.

ठाणे बेलापूर औद्योगिक पट्टय़ात पावणे गावानजीक एमआयडीसी आहे. पारसिक डोंगर रांगेत हा भाग असल्याने पंपन्याच्या मागील भागात उंच डोंगर आहेत. याच उंच डोंगरमाथ्यावरून संध्याकाळी पाचच्या सुमारास आज अचानक ओल्या मातीचा लोळ खाली आला. त्याचे प्रमाण एवढे प्रचंड होते की, सी 38/39 भूखंडावर असणाऱया आर्ट फ्युजन पंपनी आणि त्याच्या आसपास असणाऱया 4/5 पंपन्यात हा मातीचा लोळ घुसला. त्यामुळे अनेक पंपन्यातील मशीनरी, पार्ंकगमधील पाच ते सहा गाडय़ा ओल्या मातीच्या ढिगाऱयाखाली लुप्त झाल्या. सुदैवाने पंपनीतील लोकांनी पळ काढल्याने कोणतीही प्राणहानी झाली नाही.

स्थानिकांनी दिलेल्या माहिती नुसार नवी मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात मान्सूनपूर्व कामात नाल्यातील काढलेला गाळ येथे टाकला जातो. यासाठी काही लोक प्रति डंपर पैसे घेतात. या गाळाचा एक मोठा डोंगर बनला होता. नाल्यातील गाळ असल्याने आणि डोंगरावर झाडें नसल्याने हा गाळ डोंगरावरील मातीला चिकटून राहिला नाही. परिणामी अतिभार झाल्याने तो सर्व खाली आला.

आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी

घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, अग्निशमन दल, एमआयडीसी अधिकारी, प्रदूषण नियंत्रण विभाग अधिकारी आदी  आपत्कालीन यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी दलाने कोणी कामगार किंवा व्यक्ती पंपन्यांमध्ये अडकून पडले आहेत का याची तपासणी केली. त्याचवेळी त्यांनी ढिगाऱयाखाली अडकलेल्या गाडय़ा काढण्याचा प्रयत्न केला. अवघी एक गाडी बाहेर काढण्यात त्यांना यश आले