
मोदी सरकारच्या काळात वेगवेगळ्या परीक्षांचा पार बोजवारा उडाला आहे. अनेक परीक्षांमध्ये होत असलेले घोळ थांबवण्यात मोदी सरकारला सपशेल अपयश आले आहे. आता पेंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) घेण्यात येणाऱया राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) आणि नेव्हल अपॅडमीच्या (एनए) परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत यूपीएससीचे सर्व्हर सतत डाऊन होत होता. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना अर्ज भरताना प्रचंड अडचणी आल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.
या परीक्षांसाठी 9 जून रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत अंतिम मुदत होती. मात्र, यूपीएससीचे सर्व्हर दिवसभर सतत डाऊन होत होते. ही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे देशभरातील हजारो इच्छुक विद्यार्थ्यांना अर्ज भरता आले नाही. त्यामुळे यूपीएससीने अर्ज दाखल करण्यासाठी दोन-तीन दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. संरक्षण दलात करिअर करू इच्छिणाऱया तरुण-तरुणींसाठी एनडीए ही देशातील अत्यंत मानाची परीक्षा मानली जाते. मात्र, मोदी सरकारच्या भोंगळ कारभारामुळे हजारो विद्यार्थ्यांचे स्वप्न भंगले आहे. आता अर्ज भरण्यास मुदतवाढ मिळते का, याकडे विद्यार्थ्यांचे डोळे लागले आहेत.






























































