विरारमध्ये भरधाव कारने 3 वाहनांसह पादचाऱ्याला उडवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
odisha accident

विरारच्या नारिंगी उड्डाणपुलावर आज  भीषण अपघात झाला.एका भरधाव होंडा सिटी कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या या विचित्र अपघातात एका पादचाऱयासह एकूण चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

एक होंडा सिटी कार अत्यंत वेगाने नारिंगी उड्डाणपुलावरून जात होती. अचानक चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्यावरील डिव्हायडर ओलांडून विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये घुसली. विरुद्ध मार्गात घुसलेल्या या भरधाव कारने समोरून येणाऱया एका पिक-अप वाहनाला आणि त्याच्या मागून येणाऱया अर्टिगा कारला जोरदार धडक दिली.