
कृषी पदविका अभ्यासक्रमांना व्यावसायिक दर्जा देण्याबाबत महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, कृषी विद्यापीठ व उच्च तंत्रशिक्षण विभागाचे अभिप्राय घेऊन योग्य तो निर्णय सर्वानुमते घेण्यात येणार असल्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले.
कृषी पदविका अभ्यासक्रमांना व्यावसायिक दर्जा देण्याबाबत कार्यवाही करावी, राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमार्फत चालविण्यात येणाऱ्या कृषी पदविका अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक दर्जा देणे, अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता वाढविणे, कृषी पदविका अभ्यासक्रमांना व्यावसायिक दर्जा दिल्यास मिळणारे लाभ याचा अभ्यास करावा, कृषी विभागाने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे याबाबत कार्यवाही करावी अशा सूचना दत्तात्रय भरणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.





























































