
शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनाप्रणीत शिव विधी व न्याय सेना, महाराष्ट्र राज्यच्या वतीने शनिवार, 13 जून रोजी कायदेशीर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवसेना भवन, दुसरा मजला, दादर येथे सायंकाळी 4.30 ते 6.30 या वेळेत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई उपस्थित राहणार आहेत. तर कार्यक्रमाचे मुख्य वक्ते मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता ऍड. मनोज कोंडेकर आहेत. यावेळी गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्याचे वाटपही करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक संघटनेचे अध्यक्ष ऍड. नीतेश सोनवणे व उपाध्यक्षा ऍड. स्वप्ना कोदे आहेत.































































