महाकाल मंदिरात भस्म आरती बघण्यासाठी घेणार शुल्क

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उज्जैनच्या महाकाल मंदिरातील जगप्रसिद्ध अशा भस्म आरतीच्या नियमांमध्ये मंदिर समितीने मोठे बदल केले आहेत. भस्म आरतीसाठी मिळणारी मोफत एन्ट्री आणि ऑफलाईन बुकिंग पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांच्या खिशाला चाट बसणार आहे. महाकाल मंदिरात दर्शनसाठी येणाऱ्या भाविकांना नव्या नियमांचे पालन करावे लागेल. आतापर्यंत भस्म आरतीसाठी 300 लोकांना मोफत प्रवेश दिला जात असे. मात्र आता भाविकांकडून 200 रुपये शुल्क घेतले जाणार आहे. आता सर्व बुकिंग ऑनलाईन करावे लागेल. पूर्वी भस्म आरतीचे बुकिंग तीन महिने आधी करता यायचे. आता ही मर्यादा एक महिना करण्यात आली आहे.