ठाण्याचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल लवकरच सुरू होणार, ९०० बेड्स, १८ ऑपरेशन थिएटर्स, हेलिपॅड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मल्टी स्पेशालिटी सिव्हिल हॉस्पिटलचे काम अखेर पूर्णत्वास आले असून ते लवकरच सुरू होणार आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या सरकारी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा असून सुमारे ९०० बेडसची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तातडीच्या गंभीर रुग्णांसाठी एअर अॅम्ब्युलन्सदेखील राहणार असून आयसीयू, कॉर्डिओलॉजी, डायलिसिस, सिटी स्कॅन अशा सर्व प्रकारच्या सोयी आहेत. हे हॉस्पिटल म्हणजे ठाणे जिल्हा व परिसरातील गोरगरीब रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे.

पार्किंगसाठी स्वतंत्र इमारत
रुग्णांच्या सेवेत लवकरच दाखल होत असलेल्या अत्याधुनिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये १८ ऑपरेशन थिएटर्स असून पार्किंगसाठी सात मजल्याची स्वतंत्र इमारत बांधण्यात आली आहे. १३ मजल्याच्या २ भव्य इमारतींमध्ये सिव्हिल हॉस्पिटलचा कारभार चालणार आहे. स्वतंत्र हेलिपॅड हेदेखील या रुग्णालयाचे वैशिष्ट्य असल्याची माहिती सिव्हिल सर्जन डॉ. कैलास पवार यांनी दिली.