वसईतील ‘वीराच्या गोष्टी’ मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन, नऊ वर्षांच्या चिमुकल्या वीराचे पुस्तक वाचकांच्या भेटीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वसईतील नऊ वर्षीय चिमुरडी वीरा चौधरी हिने लिहिलेल्या ‘वीराच्या गोष्टी’ या पुस्तकाचे प्रकाशन पुणे येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात मोठ्या उत्साहात झाले. या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन वेलवेट पब्लिकेशन आणि झेप या सामाजिक संस्था माध्यमातून करण्यात आले. याच कार्यक्रमात ४४ लेखकांची ५० पुस्तके एकाच वेळी प्रकाशित करून संस्थेने अनोखा जागतिक विक्रम प्रस्थापित आला असून या उपक्रमाची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे.

विश्वविक्रमी
वीरा चौधरी ही वसईतील डॉ. एम. जी. परुळेकर शाळेत शिकत आहे. तिच्या बालमनातून साकारलेल्या काल्पनिक २५ गोष्टी तिने पुस्तकात शब्दबद्ध केल्या आहेत. पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला लेखिका रोहिणी निनावे, गायिका मंजुश्री ओक, पत्रकार-समीक्षक सौमित्र पोटे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचे प्रतिनिधी अशोक आदक, वीराचे वडील दर्शित चौधरी, आई कविता चौधरी, वेलवेट पब्लिकेशनच्या संस्थापक वर्षा ठुकरूल आणि सिंधू बागवे आदी उपस्थित होते.