इटलीमध्ये गुरुद्वाराबाहेर दोन हिंदुस्थानींची गोळ्या झाडून हत्या, वैशाखी सोहळ्यात रक्ताचा सडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इटलीतील बर्गामो प्रांतातील कोवो शहरात शुक्रवारी दोन हिंदुस्थानींची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना वैशाखी उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान शीख प्रार्थनास्थळ असलेल्या गुरुद्वारातून दोघे बाहेर पडत असताना घडली. रागिंदर सिंग (48) आणि  गुरमित सिंग (48) अशी मृतांची नावे आहेत. कोवो येथील औद्योगिक क्षेत्रात असलेल्या ‘गुरुद्वारा माता साहिब कौर जी’जवळ मध्यरात्री हा हल्ला झाला. हल्लेखोर गोळीबार केल्यानंतर कारमधून पळून गेला. प्राथमिक तपासाअंती, हा प्रकार अचानक उद्भवलेल्या भांडणातून घडलेला नसून नियोजनबद्ध कट असावा, असा संशय अधिकारी व्यक्त करत आहेत. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, गोळीबार करणारा व्यक्तीदेखील हिंदुस्थानी असून तो नियमितपणे गुरुद्वारामध्ये येत असे.