नेस्को ड्रग पार्टी प्रकरणी चौघांच्या पोलीस कोठडीत वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नेस्को ड्रग पार्टी प्रकरणी अटकेत असलेल्या आनंद पटेल, विनीत गेरेलानी, शुभ अग्रवाल, आयुष विकी आज बोरिवली येथील न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याच्या कोठडीत वाढ केली आहे. त्या चौघांच्या बँक खात्याची पोलिसांनी तपासणी केली. घटनेच्या दहा दिवस आणि घटनेनंतर त्याने मोठय़ा प्रमाणात पैशाची देवाणघेवाण केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

नेस्को ड्रग पार्टी प्रकरणी 10 जणांना अटक केली होती. आनंद, विनीत, शुभ आणि आयुषच्या पोलीस कोठडीची आज मुदत संपत असल्याने त्याना पोलीस बंदोबस्तात बोरिवली येथील न्यायालयात हजर केले होते. त्या चौघांच्या बँक खात्याची पोलिसांनी तपासणी केली. खात्यात आलेले पैसे त्याने एकमेकांना ट्रान्स्फर केले होते. तसेच त्याने पार्टीसाठी आणलेल्या ड्रगच्या गोळ्या एका मोठय़ा तस्करांकडून घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्याने एका ड्रग तस्कराच्या खात्यात पैसे पाठवले होते. पार्टीच्या आयोजकांनी एका कंपनीला सुरक्षेसाठी जबाबदारी दिली होती. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत वाढ केली.

तो मोठा सप्लायर कोण

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयुष हा ड्रग तस्करी करणाऱ्या एका मोठय़ा तस्करांच्या संपका&त होता. ड्रग पार्टी प्रकरणी गुन्हा झाल्यावर तो तस्कर हा पळून गेला आहे. तसेच त्या चौघांनी एका तस्करांच्या पत्नीच्या खात्यावरदेखील पैसे ट्रान्स्फर केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.

पोलिसांनी अटक केलेला सुरक्षा रक्षक प्रदीप गुप्ताने आयुष आणि विनीतला विनातिकीट इव्हेंटच्या ठिकाणी सोडले होते.

अटक आरोपीचे ड्रग सिंडिकेट्स संबंध असल्याचा पोलिसांना संशय.

त्या पार्टीला मोठय़ा प्रमाणात ड्रगचा पुरवठा झाल्याचे प्राथमिक तपासात आले समोर.