बेस्ट बसच्या हॅण्डब्रेकमध्ये कोणताही दोष नव्हता! भांडुपमधील अपघात प्रकरणी चालकावर कारवाई होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘मुंबईकरांची दुसरी जीवनवाहिनी’ असलेल्या बेस्ट बसचा प्रवास ‘रामभरोसे’ बनला आहे. चालकांकडून निष्काळजीपणे ड्रायव्हिंग करण्याचे प्रमाण वाढाल्याचे भांडुपमधील रविवारच्या अपघातातून समोर आले. चालकाने हॅण्डब्रेकच न लावल्यामुळे थांब्यावर उभी करून ठेवलेली बस स्वतःच वेगाने मागे गेली. बसच्या हॅण्डब्रेकमध्ये कोणताही दोष नाही, असा निष्कर्ष अभियांत्रिकी विभागाने सोमवारी काढला. अपघात प्रकरणी आता संबंधित चालकाविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे.

भांडुप रेल्वे स्थानक परिसरात रविवारी दुपारी बस मार्ग क्र. 606वर प्रवाशी सेवा देणाऱ्या बेस्ट बसला अपघात झाला. याच मार्गावर डिसेंबर 2025मध्ये मोठा अपघात झाला होता आणि त्यात चौघांचा बळी गेला होता. रविवारी नगदास नगर येथून निघालेली बस भांडुप स्थानक पश्चिमच्या थांब्यावर उभी होती. गंतव्य बस स्थानक असल्यामुळे चालक-वाहक बस चौकीमध्ये रिलिफ घेण्यासाठी गेले होते. या वेळी बस वेगाने मागे जात टेलिपह्न बूथवर आदळली. चालकाने हँडब्रेक न लावल्याचा अंदाज वर्तवला गेला होता. त्याला अभियांत्रिकी विभागाच्या तपासणीअंती दुजोरा मिळाला आहे. अभियांत्रिकी विभागाने बसगाडीची तपासणी करून सोमवारी अपघाताबाबत निष्कर्ष काबसच्या हॅण्डब्रेकमध्ये कोणताही दोष आनाही, असे विभागाने म्हटले. यासंदर्भात सविस्तर अहवाल सादर करण्यात येणार आहे. त्याआधारे चालक शरद सूर्यवंशीविरुद्ध कारवाई केली जाईल, असे बेस्ट उपक्रमाने जाहीर केले. बेस्टच्या ताफ्यात खासगी कंत्राटदारांच्या गाड्यांचे प्रमाण अधिक आहे. कंत्राटी चालक बेफिकीरपणे ड्रायव्हिंग करीत असल्यामुळे अलीकडच्या काळात बेस्ट बसच्या अपघातांचे प्रमाण वाआहे. त्यामुळे प्रवाशी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

9 डिसेंबर 2024 कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेर बेस्टच्या इलेक्ट्रीक बसला भीषण अपघात झाला. भरधाव बसने जमावाला धडक दिली. त्यात 9 जणांचा मृत्यू, तर 40 जण जखमी झाले होते.

29 डिसेंबर 2025 मार्ग क्र. 606 बसचा चालक गाडी रिव्हर्स घेताना त्याचे नियंत्रण सुटले. त्यात चौघांचा मृत्यू झाला, तर 12 ते 14 जण जखमी झाले होते.

26 मार्च 2026 लोअर परळमध्ये बेस्टची बस रस्ते दुभाजकावर चढली होती. सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.