
ज्ञानबिंदू अकॅडमीचे संचालक रोशन आनंद यांचे बंधू प्रिन्स यादव यांचा नेपाळमध्ये संशयास्पद मृत्यू झाला. विराटनगरच्या हॉटेलमध्ये मृतदेह आढळला. याप्रकरणी नेपाळ पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. खान सरांच्या कोचिंग क्लासवर हल्ला प्रकरणी रोशन आनंद आणि प्रिन्स यादव यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता.



























































