
अज्ञात कारणातून 27 वर्षीय तरुणीने गळफास घेत जीवन संपवल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथे घडली. रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. श्रद्धा अशोक सकपाळ असे मयत तरुणीचे नाव आहे.
घराशेजारील जनावरांच्या गोठ्यात श्रद्धाने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच साखरपा पोलीस दूर क्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन जाधव, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल मनस्वी पावसकर, पोलीस कॉन्स्टेबल तानाजी पाटील साखरपा पोलीस पाटील शैलजा पवार, साखरपा उपसरपंच शशिकांत लिंगायत यांनी घटनास्थळी धाव घेतली.
मृतदेह साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. यावेळी देवरुखचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. मात्र आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पोलीस कार्यवाही सुरु आहे.





























































