
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 9 जून 2000 रोजी स्थापन केलेल्या रेल कामगार सेनेचा 26 वा वर्धापन दिन इगतपुरी येथे मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. रेल कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या हस्ते प्रतीकात्मक वृक्षारोपण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. अतिथींना झाडाचे रोप भेट म्हणून देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
शिवसेना उपनेते, रेल कामगार सेनेचे सरचिटणीस दिवाकर देव, संघटनेचे कार्याध्यक्ष संजय जोशी यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी शिवसेनेचे नाशिक जिल्हाप्रमुख (ग्रामीण) निवृत्ती जाधव, उपजिल्हाप्रमुख कुलदीप चौधरी, डोंबिवली (प.) शहरप्रमुख सुरेश परदेशी, राजू नाठे, कावजी ठाकरे, भूषण जाधव, दौलत बोंडे, दि. ना. उघाडे आदी मान्यवर उपस्थित होते. मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ व नागपूर विभागांतील शेकडो कर्मचारी, पदाधिकारी व महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. मुंबई विभागाचे सचिव तुकाराम कोरडे यांनी विभागाध्यक्ष चंद्रकांत विनरकर यांच्या नेतृत्वाखाली सन 2025-26 मध्ये मुंबई विभागाने केलेल्या उल्लेखनीय कार्याचा अहवाल सादर केला. यावेळी प्रतीक गायकर, मिलिंद पाटील, मनोज पवार, अमोघ निमसूडकर, संजय चिपकर, संतोष देवळेकर, ललित मुथा, वाहिदभाई शेख व मोहन दुधाने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अतुल गोयकाणे, मधुकर गायकर, संजय लंबे, बबन कडू, गौतम कडू, दिनेश सोलंकी, योगेश भोईर, दत्ता भोईर, संजय माळी, भाऊसाहेब पुंजा, मंगेश चिमटे, समाधान सानप, गोरख चव्हाण, दीपक जगताप, हनुमान भगत, मनोहर महाले, काशीनाथ भोईर, राहुल शिंदे, गणेश खाटके, शंकर डावखर, जगदीश लंगडे, प्रतीक जाधव आदींनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवराम म्हसने यांनी केले.
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा
सोहळ्याच्या निमित्ताने रेल्वे कर्मचाऱयांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. इगतपुरी रेल्वे रुग्णालयातील सुविधा, रेल्वे वसाहतींच्या समस्या, इंजिनीअरिंग, लोको, ट्रफिक, कमर्शियल, एस अॅण्ड टी, ओएचई, ऑपरेटिंग, वर्कशॉप, कारशेड व सी अॅण्ड डब्ल्यू विभागांतील विविध प्रश्नांवर चर्चा झाली. तसेच आठव्या वेतन आयोगाच्या पार्श्वभूमीवर रेल कामगार सेनेची भूमिका मांडण्यात आली. सोहळ्याचे औचित्य साधून विविध संघटनांतील अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱयांनी रेल कामगार सेनेत जाहीर प्रवेश केला.



























































