
स्पर्धा कोणतीही असो, सामना संपल्यानंतर प्रेक्षकांनी स्टेडियममध्ये टाकलेला कचरा उचलून जपानी प्रेक्षक नेहमीच आपली स्वच्छता मोहीम राबवतात. कालही डचविरुद्धचा सामना बरोबरीत सोडवल्यानंतर जपानी फॅन्सनी आर्लिग्टनच्या डल्लास स्टेडियममध्ये पडलेला कचरा गोळा करत नेहमीप्रमाणे प्रेक्षकांसमोर आदर्श ठेवला.




























































