जम्मू-कश्मीरमधील राजौरी येथे भूसुरुंग स्फोट; चार जवान जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात मंगळवारी नियंत्रण रेषेजवळ झालेल्या एका भूसुरुंग स्फोटात कनिष्ठ अधिकाऱ्यांसह लष्कराचे चार जवान जखमी झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

नौशेरा सेक्टरमधील कलाल या समोरील भागात लष्कराच्या जवानांकडून गस्त सुरू असताना एका भूसुरुंगचा अपघाती स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या स्फोटात एक जेसीओ आणि तीन सैनिक जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

घुसखोरी विरोधी मोहिमेचा एक भाग म्हणून समोरील भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर भूसुरुंग पेरलेले असतात. काहीवेळी पावसामुळे भूसुरुंग वाहून येतात आणि त्यामुळे अशा अपघाती घटना घडतात, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. पीटीआय.