आमचा एकही खासदार फुटणार नाही! शरद पवार यांचा ठाम विश्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे खासदार फुटणार या चर्चेला काही अर्थ नाही. आमचा एकही खासदार फुटणार नाही, असा ठाम विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी ‘ऑपरेशन तुतारी’ची चर्चा फेटाळून लावली.

शिवसेनेच्या मशाल चिन्हावर निवडून आलेले सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या ‘गँग ऑफ गद्दार’मध्ये सहभागी झाले. यानंतर राज्यात लवकरच ऑपरेशन तुतारी सुरू होणार असून राष्ट्रवादीचे खासदार-आमदार फुटणार असल्याची चर्चा सुरू आहे. यासंदर्भात बारामती दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न केला असता त्यांनी आमचा एकही खासदार किंवा इतर कोणताही लोकप्रतिनिधी पक्ष सोडून जाणार नाही. त्यामुळे कोणीही चिंता करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले.

अजितदादा गटाच्या  धर्मरावबाबा आत्रामांचा दावा काय?

अजितदादा गटाचे धर्मरावबाबा आत्राम यांनी येत्या 12 डिसेंबरपूर्वी राष्ट्रवादीचे तब्बल 5 खासदार फुटतील आणि ते महायुतीत  येतील, असा दावा केला आहे.

सुप्रिया सुळेंनी उडवली खिल्ली

ते 5 खासदार कोण ही माहिती असेल तर त्यांनी नावे सांगावीत. मी त्यांच्यासोबत चर्चा करण्यास तयार आहे, ते माझ्याशी बोलले तर आम्ही 8 ही जण येऊ, असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी आत्राम यांच्या खासदार फुटीच्या दाव्याची खिल्ली उडवली.