
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील लुटमारीच्या तीव्र निषेध करत आज शिवसेनेच्या वतीने चेंबूर येथे रामरक्षा पठण, महाआरती आणि निषेध आंदोलन केले. चेंबूर व अणुशक्ती नगर विधानसभेच्या वतीने वाडवली गाव येथील श्री साईबाबा मंदिर येथे हे आंदोलन करण्यात आले. शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच विभागप्रमुख प्रमोद शिंदे आणि महिला विभाग संघटक पद्मावती शिंदे यांच्या पुढाकाराने हे आंदोलन आणि महाआरती पार पडली. यावेळी शिवसेना उपनेते सुबोध आचार्य, माजी विभागप्रमुख माणिक पाटील, माजी आमदार प्रकाश फातर्पेकर, विधानसभा संघटक निमीष भोसले, महेंद्र नाकटे, संजय नटे, माजी नगरसेवक अनिल पाटणकर, विधानसभा प्रमुख रुक्मिणी भोसले, विधानसभा संघटक सुमित्रा नेमाडे, नीलम डोळस, संध्या सावंत, अमित शिंदे, संदीप भोईर, दीपा डावल आदी उपस्थित होते.



























































