नीट परीक्षा निकालात गोंधळ; केंद्र सरकारसह एनटीएला हायकोर्टाची नोटीस, आठवडाभरात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नीट-यूजी 2026 परीक्षेच्या निकालातील गोंधळा प्रकरणी विद्यार्थिनीने हायकोर्टात धाव घेतली आहे. या याचिकेची दखल घेत न्यायालयाने या प्रकरणी केंद्र सरकारसह राष्ट्रीय परीक्षा संस्थेला (एनटीए) नोटीस बजावत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.

नीट-यूजी 2026 परीक्षा देणाऱया स्नेहा गमणे हिला गुणपत्रिकेत 340 गुण मिळाले आहेत. ओएमआर शीट व उत्तरपत्रिकेनुसार तिला 410 गुण मिळणे अपेक्षित होते. 113 प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली असून 46 प्रश्नांची उत्तरे चुकीची आहेत. तसेच एक प्रश्न वगळण्यात आला आहे. गुणांकन पद्धतीनुसार तिच्या गुणांमध्ये 70 गुणांची तफावत आढळल्याने निकालातील या गोंधळा प्रकरणी तिने अ‍ॅड. विवेक आरोटे यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर गुरुवारी न्यायमूर्ती रियाज छागला व न्यायमूर्ती फरहान दुभाष यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितले की, केंद्र सरकार व एनटीएला याबाबत माहिती देण्यात आली, मात्र त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही.