
मुंबईचे आद्य शिल्पकार, थोर शिक्षण महर्षी, समाजसुधारक आणि हिंदुस्थानी रेल्वेचे जनक नाना शंकरशेट यांच्या 161 व्या पुण्यतिथीनिमित्त आज तमाम नानाप्रेमींनी मानवंदना दिली. गिरगावातील नाना शंकरशेट चौकात महापालिकेच्या ‘डी’ विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष साळुंखे आणि स्थानिक नगरसेवक अॅड. गौरांग जव्हेरी उपस्थित होते. मध्य रेल्वे मुख्यालयातील नानांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रेल्वे क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला.
मुंबई महापालिकेच्या मुख्यालय, सभागृहातील नाना शंकरशेट यांच्या तैलचित्रास उपमहापौर संजय घाडी, अतिरिक्त आयुक्त संजोग कबरे, महापालिका सचिव मनोज कांबळे यांनी पुष्पहार अर्पण केला. एशियाटिक सोसायटी येथील नानांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे आणि समिती सदस्यांनी नानाप्रेमींचे स्वागत केले. या सोहळ्यास अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नत्ती परिषदेचे अध्यक्ष, समाजश्रेष्ठाr डॉ. गजानन रत्नपारखी, नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्रभाऊ शंकरशेट, सरचिटणीस अॅड. मनमोहन चोणकर, चंद्रशेखर दाभोळकर, दिनकर बायकेरीकर, डॉ. विवेक रायकर, रविंद्र माहिमकर, विजय पितळे, दिलीप मालंडकर यांच्यासह शंकरशेट पुटुंबीय आणि नागरिक उपस्थित होते.





























































