ट्रेंड – उंदीर निघाला सराईत चोर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटकातील तुमपूर येथील एका दागिन्यांच्या दुकानातून 10 लाख रुपये किमतीचे हिरे आणि सोन्याचे दागिने कोण्या इसमाने चोरले नाहीत तर चक्क एका उंदराने चोरले आहेत. दुकान मालकाने जेव्हा सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा ही अजब चोरी उघडकीस आली. गायब झालेल्या ऐवजांमध्ये हिऱयांनी जडवलेल्या अंगठय़ा, सोन्याचे हार असा अंदाजित सुमारे 10 लाख रुपयांचा मुद्देमाल होता. उंदराने दागिने दुकानाच्या एका कोपऱयात नेले आणि तो गायब झाला. फुटेजच्या आधारे, दुकानातील कर्मचाऱयांनी उंदराचा माग काढत एका बिळातून सर्व हरवलेले दागिने शोधून काढले. यामध्ये 10 अंगठय़ा आणि तीन नेकलेसचा समावेश होता. हा व्हिडीओ @path2shah या एक्स अकाउंटवर शेयर करण्यात आला असून ‘‘बिचारा उंदीर, त्याला फक्त पुढचा मेहुल चोस्की बनायचं होतं,’’ अशी मजेशीर कमेंट एका नेटीझनने केली आहे.