
गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या २४६ गणपती स्पेशल ट्रेनचे आरक्षण शनिवारपासून सुरू होत आहे.
कोकणातील गणेशोत्सवासाठी मुंबई-ठाण्यातून जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांना दलालांच्या घुसखोरीमुळे नियमित ट्रेनचे तिकीट मिळत नाही. त्यामुळे या ट्रेन सोडल्या असून या विशेष ट्रेनचे बूकिंग १ ते ३ ऑगस्टदरम्यान टप्प्याटप्प्याने खुले केले जाणार आहे. यावेळी ‘कन्फर्म तिकीट’ मिळवायचेच या निर्धाराने अनेक चाकरमान्यांनी शुक्रवारी आदल्या दिवशीच दादर, ठाणे, कल्याण यांसारख्या प्रमुख रेल्वे स्थानकांतील तिकीट खिडक्यांवर रांगा लावल्या आहेत.
शनिवारी पहिल्या दिवशी खुले होत असलेल्या आरक्षणामध्ये गाडी क्रमांक ०१४४५, ०११६७,
तारीखनिहाय आरक्षण
१ ऑगस्ट – गाडी क्र. ०११५३, ०१४४५, ०११६७ आणि ०१४४७
२ ऑगस्ट – गाडी क्र. ०११६५ आणि ०११८५
३ ऑगस्ट – गाडी क्र. ०११०३, ०११२९, ०११५१, ०११७१ आणि ०११३१
०१४४७ आणि ०११५३ (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी) या गाड्यांचा समावेश आहे.
‘गणराया, विशेष ट्रेनचे ‘कन्फर्म तिकीट’ मिळू दे’, असे साकडे घालून अनेकजण आरक्षणासाठी लांबलचक रांगेत उभे राहिले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे काम यंदा पूर्ण होईल, असे आश्वासन दिले होते. मात्र ते आश्वासन ‘खड्यात’ गेल्याने मोठ्या प्रमाणावर चाकरमानी गणपती स्पेशल ट्रेनचे तिकीट मिळवण्यासाठी तिकीट खिडक्यांकडे वळले आहेत.






























































