
मीरा-भाईंदर पालिकेच्या औषध फवारणी विभागात कार्यरत असलेल्या १५० कंत्राटी कामगारांना एप्रिलपासून चार महिन्यांचा पगारच मिळालेला नाही. पगार नसतानाही कामगारांकडून नियमितपणे औषध फवारणीचे काम करून घेतले जात आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत कामगार कर्मचारी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. दोन दिवसांत कामगारांचे वेतन दिले नाही तर अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
औषध फवारणीचा ठेका संपल्याचे कारण देऊन कामगारांचा पगार थकित ठेवला आहे. कराराचे नूतनीकरण
वेतन नाही तरी रोज कामावर येण्याचे आदेश जिगर मेकिंग ठेकेदारावर कारवाईची मागणी कंत्राटदाराकडून वेतन देण्यात अपयश आल्यास महानगरपालिका प्रशासनाने पालकत्वाची भूमिका स्वीकारून कामगारांचे थकीत वेतन दिले पाहिजे.
कामगारांकडून नियमितपणे काम करून घेतले जात असताना चार महिन्यांचे वेतन प्रलंबित राहण्यास जबाबदार असलेल्या संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी कामगार संघटनेने केली आहे. झाल्यानंतर पगार दिला जाईल, असे सांगितले जात आहे. मात्र तोपर्यंत कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. पगार थकित असतानाही कामगार नियमितपणे कामावर येत असून
शहरात रोगराई पसरू नये म्हणून औषध फवारणीचे काम करत आहेत. मात्र त्यांच्या योगदानाची दखल कोणालाही नाही, असा संताप मनसेचे अभिनंदन चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.





























































