
अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर ऑगस्टमध्ये कॉमेडी, सस्पेन्स, कौटुंबिक नाती आणि भावनिक कथांचा खास अनुभव घेता येणार आहे. नुकताच स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे यांचा ‘बाई ग’ हा चित्रपट स्ट्रीम झाला आहे. ‘सौभाग्यवती सरपंच 2’ या वेब सिरीजमध्ये अवलीची (देविका दफ्तरदार) गावातील राजकीय आणि सामाजिक लढाई पुढे सुरू राहते. ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’मध्ये तीन भावांची गॅरेजमधील गोष्ट दाखवण्यात आली आहे.
‘भागुबाई’ चित्रपटामध्ये निर्मिती सावंत यांनी साकारलेली व्यक्तिरेखा गावातील घडामोडी आणि गुपितांभोवती फिरते. ‘8 वाजून 13 मिनिटे’ ही सीरिज सुनील बर्वे यांनी साकारलेल्या बँक मॅनेजरच्या आयुष्याभोवती फिरते. याशिवाय ‘नशीब-किस्मत’, ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’, ‘मारुती नगर पोलीस स्टेशन’, ‘वडापाव’, ‘ज्ञानेश्वर माऊली’, ‘पैरी’ या कलाकृती प्लॅटफॉर्मवर पाहता येतील. यात ‘रहस्यम’ आणि ‘असावमी’ या दोन नव्या वेबसीरिजचीही भर पडणार आहे.




























































