
मध्य प्रदेशातील सिंगरौलीचे भाजप आमदार रामनिवास शाह यांनी आपली खासगी कार धुण्यासाठी चक्क सरकारी अग्निशमन दलाच्या बंबाचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भररस्त्यात गाडी धूत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर शाह यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. दरम्यान, प्रसारमाध्यमांनी शाह यांना याबाबत विचारले असता त्यांनी आमदार स्वतःची कार स्वतः धुणार का? असा उलट सवाल केला.




























































