
मुंबईत आंदोलनांवर घालण्यात आलेल्या बंदीवरून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील हे चांगलेच भडकले. 45 लाख गाडय़ा घेऊन 90 लाख मराठे मुंबईत जाणार म्हणजे जाणारच. आम्ही रेल्वे फिरू देणार नाही, विमान उडू देणार नाही. मुंबईत आंदोलन करण्यासाठी परवानगीचा अर्ज दिला आहे. परवानगी द्या नाहीतर, नका देऊ… अशी ठाम भूमिका मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे- पाटील यांनी मांडली. आम्ही कायद्याचा सन्मान करतो, सरकारनेही कायद्याची बूज राखावी, असेही ते म्हणाले.






























































