
राजस्थानमध्ये सरकारी नोकऱ्या मिळवण्यासाठी बनावट पदव्या दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी श्री सत्य साई विद्यापीठाचे कुलगुरू मुकेश तिवारी, परीक्षा नियंत्रक संजय राठोड आणि संगणक ऑपरेटर आनंद शर्मा या तिघांना अटक करण्यात आली आहे. तर भारमल राम यालाही याआधीच अटक करण्यात आली आहे.
एसओजीनुसार, विद्यापीठाच्या नोंदी, डिजिटल पुरावे आणि इतर संबंधित उमेदवारांच्या पदव्यांची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. 100 बीपीएडच्या जागा भरण्यासाठी जाहिरात करण्यात आली. या जागेसाठी एकाच विद्यापीठातून बीपीएड पदवी मिळवलेले एकूण 66 उमेदवार आले. यामुळे विशेष कृती गटाला (एसओसी) संशय आला. राज्याबाहेरून बीपीएड पदवी घेतलेल्या उमेदवारांची संख्या असामान्य होती.




























































