4 हजार किलो भेसळयुक्त खवा जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील कानपूर, मेरठ, हापुड, मुझफ्फरनगर आणि मुरादाबाद जिह्यात केलेल्या धडक कारवाईत अन्न सुरक्षा विभागाने तब्बल 4 हजार किलो भेसळयुक्त खवा जप्त केला आहे. हा खवा जप्तीनंतर नष्ट करण्यात आला आहे. या खव्यात डिटर्जंट, टॅल्कम पावडर, स्किम्ड मिल्क पावडर, पाम तेल आणि हायड्रोजन पेरॉक्साइडसारख्या वस्तूंचा वापर करण्यात आला होता. हे सर्व आरोग्यासाठी अत्यंत घातक होते.