
लष्कराच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने शेतात आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये मंगळवारी सकाळी ही घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही मोठी दुर्घटना किंवा जीवितहानी झाली नाही. हेलिकॉप्टर शेतात उतरल्याचा एक व्हिडिओदेखील व्हायरल होत आहे.
जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, चमरान गढी येथील गावकऱ्यांनी मंगळवारी सकाळी लष्कराची दोन हेलिकॉप्टर्स आकाशात घिरट्या घालताना पाहिली. दरम्यान, तांत्रिक बिघाडामुळे एक हेलिकॉप्टर शेतात उतरले. हेलिकॉप्टर सुमारे 20 मिनिटे शेतातच थांबून राहिले. पायलटने हेलिकॉप्टर खाली उतरवून बिघाड दुरुस्त करण्यास सुरुवात केली. पायलटने बिघाड दुरुस्त करून पुन्हा उड्डाण केले. गावकरी शेतात पोहचले तेव्हा शेतात मोठ्या प्रमाणात ऑईल सांडले होते.




























































