भ्रष्ट मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्यासाठी संपूर्ण देश एकवटला पाहिजे- संजय राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात विरोधकांनी आंदोलनांची मालिका सुरू केली असून, काँग्रेसने काल महाराष्ट्रासह दिल्ली आणि इतर राज्यांमध्ये उग्र आंदोलने केली आहेत. नागपूरमध्येही काँग्रेसने मोठे आंदोलन केले असून, येत्या 2 ऑक्टोबर रोजी सीजेपीच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी 4 ऑक्टोबर रोजी ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. तर भ्रष्ट मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्यासाठी संपूर्ण देश एकवटला पाहिजे असे आवाहनच शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी महाविकास आघाडीला एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. काल काँग्रेसने महाराष्ट्रभर स्वतंत्र आंदोलन केले असले, तरी प्रत्येकाने पक्षीय पातळीवर न लढता महाविकास आघाडी म्हणून एकत्र येऊन आंदोलन केले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. त्यासाठी वेगळे निमंत्रण देण्याची गरज नसून, आज काँग्रेसलाही या मुद्द्यावर एकत्र येण्याचे आवाहन करत आहेत, असे ते म्हणाले. एकपक्षीय आंदोलनामुळे ज्ञानेश कुमार राजीनामा देणार नाहीत, तर त्यांना हटवण्यासाठी अख्ख्या देशाने एकवटले पाहिजे, तरच ते पदावरून जातील, असा दावा त्यांनी केला. राजीनामा मागण्यासाठी आता देशभरात आंदोलनांना सुरुवात झाली असून, मुंबईतूनही भव्य मोर्चाचे आयोजन केले जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने यामध्ये पुढाकार घेतला आहे. हा मोर्चा नेमका कुठून निघणार आणि त्याचे स्वरूप काय असणार, याबाबतची घोषणा आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे करणार आहेत. हा एक अत्यंत मोठा मोर्चा असेल. मुंबईतूनच महात्मा गांधींनी ‘चले जाव’चा नारा दिला होता आणि त्यानंतर ब्रिटिश हिंदुस्थानातून गेले, अगदी त्याच धर्तीवर हा मोर्चा निघेल, असे संजय राऊत यांनी सांगितले. तसेच, आज दुपारी 3 वाजता ‘इंडिया’ आघाडीची बैठक होणार असून, त्या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार असल्याची माहिती वरिष्ठांना दिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पुढे संजय राऊत म्हणाले की, येत्या 4 तारखेच्या आत ज्ञानेश कुमार यांच्या जाण्याबाबत कोणताही निर्णय होणार नाही, परंतु जसजशी आंदोलनाची धग वाढत जाऊन ती दिल्लीपर्यंत पोहोचेल. त्यानंतर आजच्या इंडिया ब्लॉगच्या बैठकीत पुढली दिशा आंदोलनाची काय ठरतेय. त्यानंतर सरकार आपली पावलं उचलेलं. त्यानंतर कॉक्रोच जनता पार्टी त्यांनी तरुणांना आवाहन केलं आहे. मुंबईमध्ये 2 ऑक्टोबरला ते आंदोलन आहे. अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली. हळहळु हे आंदोलन देशभरात पेटत जाईल. हळुहळु त्याच्या जेव्हा भडका उडेल, त्यावेळी मला खात्री आहे की ज्ञानेश कुमार याचा राजीनामा किवा त्याला बडतर्फ करावे लागेल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला..

दात कोरून तुम्ही दानधर्म कसले करताय? संजय राऊत यांचा संतप्त सवाल

देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला खर्चात कपात करण्याचा सल्ला दिला होता, त्यावर संजय राऊत म्हणाले की,  कर्ज काढण्यापेक्षा हे जे कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांना जे काही 500 1000कोटीची ठेकेदारी देऊन दलाली वसुली केली. खर्च कमी करा सांगतायत जनतेला? तुम्ही खर्च कमी करा ना. तुम्ही दिल्ली वाऱ्या कमी करा, वारंवार चार्टर्ड फ्लाईटने दिल्लीला जाताय कशासाठी? 50-50, 100-100 कोटी ला आमदार, खासदार, नगरसेवक विकत घेताय. ती बचत करा आणि ती रक्कम दुष्काळी निधीमध्ये टाका. हे अधिक सोपं आहे. दात चोरून तुम्ही दानधर्म कसले करताय. त्यातून काय मिळणार? जनतेने खर्च करावा, जनतेला खर्च करायला तुम्ही ताकद ठेवली आहे का? खर्चाची उधळण तुम्ही करताय ती तुम्ही थांबवा. शेवटी तुम्ही कर्ज काढूनच सण साजरे करताय, म्हणजे लाडकी बहिण सारख्या योजना असतील. या तिजोरीची लूट आहे. 90-90 लाख बोगस लोकांना तुम्ही, पुरुषांना सुद्धा लाडक्या बहिणीचा लाभ देतायत मग वसूल करा. मग कर्ज काढायचं म्हणून रडताय कशाला? तुमच्या तिजोरीतील पैसे तुम्ही उडवले म्हणजे शेतकऱ्यांनी आत्महत्या करायच्या का? आता प्रत्येक आत्महत्येचे पातक हे देवेंद्र फडणवीस यांच्या माथी येईल आणि हत्येचे पातक फार वाईट असतं अशी टीका संजय राऊत यांनी केली.