
श्वास रोखला गेला… हृदयाची धडधड वाढली…अन् सामना संपण्यास अवघे काही सेकंद बाकी असताना अभिषेकने चमत्कार केला आणि पेनल्टी शूटआऊटकडे झुकलेले सामना जिंकत हिंदुस्थानच्या हॉकी संघाने अंतिम फेरीत धडक दिली. शेवटपर्यंत रंगलेल्या सामन्यात हिंदुस्थानने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 4-3 असा पराभव केला. हिंदुस्थानचा सामना आता दक्षिण कोरिया मलेशिया यांच्यातील दुसऱ्या सेमीफायनलमधील विजेत्या संघाशी होणार आहे.
साखळी फेरीमध्ये हिंदुस्थानने पाचही सामने जिंकत उपांत्य फेरीमध्ये झोकात प्रवेश केला होता. विजयाचा हाच टेम्पो हिंदुस्थानने पाकिस्तानविरुद्धही कायम ठेवला. मात्र दमदार सुरुवात केल्यानंतरही एकवेळ सामन्याचा निर्णय पेनल्टी शूटआऊटने लागतोय की काय अशी शक्यता निर्माण झाली होती. हिंदुस्थानने सुरुवातीला 3-3 अशी आघाडी घेतल्यानंतर पाकिस्तानने जोरदार पुनरागमन करत सामना 3-3 असा बरोबरीत आणला होता. मात्र शेवटच्या मिनिटाला अभिषेकने गोल करत हिंदुस्थानला विजयी केले.
!
India beat Pakistan 4-3, thanks to a last-minute goal in a nail-biting Asian Games 2026 semi-final, to book a place in the final and keep their title defence alive! ⚡
The Indian Men’s Team now stand just one win away… pic.twitter.com/J8vmZzR8K1
— Hockey India (@TheHockeyIndia) October 1, 2026
सामन्याच्या सुरुवातीपासून हिंदुस्थानने सर्वच आघाड्यांवर वर्चस्व राखले. पाचव्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करत कर्णधार हरमनप्रीत सिंग याने हिंदुस्थानला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 13 व्या मिनिटाला हरमनप्रीतने आणखी एक गोल करत ही आघाडी दुप्पट केली. फर्स्ट क्वार्टरमध्ये 2-0 ने आघाडीवर असलेल्या हिंदुस्थानने सेकंड क्वार्टरमध्ये आणखी गोल केला. सुखजित सिंह याने गोल डागत हिंदुस्थानची आघाडी 3-0 अशी केली.
मध्यांतरापर्यंत हिंदुस्थान मजबुत स्थितीत होता. मात्र त्यानंतर पुढील 30 मिनिटांमध्ये पाकिस्तानमध्ये जोरदार पुनरागमन केले आणि 30 व्या, 45 व्या आणि 49 व्या मिनिटाला गोल करत सामना 3-3 असा बरोबरीत आणला. सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये जाण्याची चिन्हे दिसत असताना अभिषेकने सर्कलजवळून मारलेला फटका पाकिस्तानी खेळाडूला लागून गोलपोस्टमध्ये गेला आणि हिंदुस्थानने 4-3 असा थरारक विजय मिळवत अंतिम फेरीतील स्थान पक्के केले.




























































