ट्रेंड – फाऊंटन पाणीपुरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुरी विव्रेत्याने भन्नाट जुगाड केलाय. त्याने एक स्वयंचलित तिखट पाण्याचा झरा तयार केलाय. पाणीपुरीमध्ये कितीही पुदिन्याचे पाणी टाकले तरी ‘भय्या थोडे तिखट पाणी द्या’ अशी मागणी वारंवार होतच असते आणि ती मागणी पूर्ण करता करता भय्यांची तारांबळ उडते. यावर सदर विव्रेत्याने हा जालीम उपाय शोधून काढला आहे. हा झरा मागेल त्याला थेट मसालेदार, तिखट पाणी देत असतो. नेटिझन्स या विव्रेत्याला इंजिनिअरिंग क्षेत्रातील दूरदर्शी म्हणून गौरवत आहेत आणि गमतीने म्हणत आहेत की, ‘नासाला अजून जास्त तिखट पाण्यामागचे भौतिकशास्त्र समजण्याआधीच त्याने एक राष्ट्रीय संकट सोडवले आहे.’ हा मजेशीर व्हिडीओ @viralworldinn या इन्स्टा आयडीवरून शेअर करण्यात आला आहे.